Pooja Chavhan Suicide Case : "राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:31 PM2021-02-13T12:31:10+5:302021-02-13T12:51:50+5:30

Pooja Chavhan Suicide Case : सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी करत भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

BJP Atul Bhatkhalkar Slams Sanjay Rathod over Pooja Chavhan Suicide Case | Pooja Chavhan Suicide Case : "राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"

Pooja Chavhan Suicide Case : "राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"

Next

मुंबई - बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण (Pooja Chavhan) या तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही; परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी करत भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबतच्या काही ऑडिओ क्लिप्स देखील जोरदार व्हायरल झाल्या आहेत. याच दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आक्रमक झाले आहेत. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल भातखळकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तसेच या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीत. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही आहेत असं देखील म्हटलं आहे. "वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत"अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. 

भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. "या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे? हे तपासलं पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे. या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताहेत" असा गंभीर आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल

परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्य करण्यावरून दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.


 

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Slams Sanjay Rathod over Pooja Chavhan Suicide Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.