Narayan Rane vs Shivsena : "सूडबुद्धी कोर्टात टिकत नाही, तिथे पुरावे लागतात उद्धवजी"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:43 PM2021-08-25T12:43:36+5:302021-08-25T12:48:14+5:30

BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government And Uddhav Thackeray over narayan rane arrest | Narayan Rane vs Shivsena : "सूडबुद्धी कोर्टात टिकत नाही, तिथे पुरावे लागतात उद्धवजी"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Narayan Rane vs Shivsena : "सूडबुद्धी कोर्टात टिकत नाही, तिथे पुरावे लागतात उद्धवजी"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत (CM Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी केवळ दोन शब्दांचं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ 'सत्यमेव जयते' असे दोन शब्दांचं ट्विट रात्री 12.32 च्या सुमारास केले आहे. यानंतर आता भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सूडबुद्धी कोर्टात टिकत नाही, तिथे पुरावे लागतात उद्धवजी" असं म्हणत भाजपाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना (Shivsena) आणि ठाकरे सरकारवर (Shivsena) पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कार्यकर्ते उरत नाहीत तेव्हा पोलिसांचा आधार घ्यावा लागतो..." असं म्हणत भाजपाने सणसणीत टोला लगावला आहे. तसेच "सूडबुद्धी कोर्टात टिकत नाही, तिथे पुरावे लागतात उद्धव जी... हे केवळ पक्षप्रमुख होऊ शकतात, मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही" असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

"राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है" 

भातखळकर यांनी याआधीही "केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Narayan Rane) हे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली? पिक्चर तो अभी शुरू हुई है, भाऊ..." असं म्हटलं होतं. तसेच "सूड दुर्गे सूड" असं म्हणत एक फोटोही पोस्ट केला. "जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते... हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार..." असं देखील भातखळकर यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.

पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला डिवण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका सिनेमातील दृष्य शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government And Uddhav Thackeray over narayan rane arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.