"मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 02:19 PM2021-06-26T14:19:19+5:302021-06-26T14:29:10+5:30

BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Maharashtra delta plus variant restrictions | "मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार"

"मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार"

Next

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. या आदेशात म्हटलं आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकतं. लेव्हल 3 मध्ये अत्यावश्यक दुकानं आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. 

अत्यावश्यक नसलेली दुकानं आणि आस्थापनं सोमवार ते शुक्रवार या दिवसांत 4 वाजेपर्यंत खुली ठेवू शकता. याच दरम्यान भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार" असं म्हणत ठाकरे सरकार जोरदार निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात 21 रुग्ण आढळले यातील एका 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. 

त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. राज्यात गुरुवारी कोविड 19 चे 10 हजाराहून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे 21 रुग्ण असून त्यातील एक दगावला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. 

"सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर आमच्याशी आहे गाठ"

अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला होता. "सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा" असं म्हणत निशाणा साधला होता. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. "राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम..." असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Maharashtra delta plus variant restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.