CoronaVirus Live Updates : "बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 11:54 AM2021-04-18T11:54:10+5:302021-04-18T12:08:01+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Corona Virus : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे.
"बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय" असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून निशाणा साधला आहे. "ऑक्सिजन नसल्यामुळे कांदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय"
अतुल भातखळकर यांनी याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे." असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"केशकर्तनालय उघडे ठेवल्याने पोलिसांनी जीव जाईपर्यंत तरुणाला केली मारहाण, राज्यात अक्षरशः अराजक माजले", भाजपाचा हल्लाबोलhttps://t.co/lf6VCtu8iz#BJP#AtulBhatkhalkar#UddhavThackeray#MaharashtraGovernment#Aurangabad#PoliceBrutality@BhatkhalkarApic.twitter.com/c7h75J8kou
— Lokmat (@MiLOKMAT) April 15, 2021
अतुल भातखळकर यांनी याआधीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून भीती वाटते, दुसरं काय?", भाजपाचा सणसणीत टोलाhttps://t.co/YejoAK7Awc#BJP#AtulBhatkhalkar#ThackerayGovernment#CoronaVaccine#CoronaVaccination#modigovt@BhatkhalkarA@BJP4Indiapic.twitter.com/0VyImT0tLb
— Lokmat (@MiLOKMAT) April 8, 2021
CoronaVirus Live Updates : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोपhttps://t.co/kZEhehyOHA#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#MaharashtraGovernment#MadhyaPradesh#ShivrajSinghChouhan#Oxygenpic.twitter.com/iZ9y4Bqwpe
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2021