"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:30 AM2021-07-05T09:30:41+5:302021-07-05T09:34:08+5:30

BJP Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Legislative Assembly session | "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"

Next

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजपाने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाचेच वातावरण असेल, असे चित्र आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रकारपरिषद घेतात ही परंपरा आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री सडेतोड उत्तरे त्यातून देतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी पत्रकारपरिषदच घेतली नाही. विरोधकांच्या प्रश्नांना आता थेट अधिवेशनातच उत्तर देण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. याच दरम्यान भाजपाने मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.  भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे…." असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आजपासून प्रारंभ: अधिवेशन वादळी ठरणार; दोन दिवस आरोप-प्रत्यारोप, गदारोळाचे! 

पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे यावेळी असेल. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेतलीच पाहिजे यासाठी काँग्रेस अडून बसली तरच निवडणूक होईल. ईडीची कारवाई, काही मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, मराठा व ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्तापक्ष व विरोधक आमनेसामने असतील. दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला असून आता या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असे सांगितले. तर केवळ गोंधळातच अधिवेशन संपावे असे विरोधकांना वाटते. महाराष्ट्राच्या हिताची एवढीच काळजी असेल तर अधिवेशन शांततेत होऊ द्या असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले.

"मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार"

भातखळकर यांनी याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं आहे. "मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार" असं म्हणत ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच "डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Legislative Assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.