“शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:39 PM2021-08-20T12:39:11+5:302021-08-20T12:44:09+5:30

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

bjp devendra fadnavis slams shiv sena over balasaheb thackeray smriti sthal shuddhikaran | “शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

“शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकताज्या लोकांनी हे केले असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाहीमहाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, हे अतिशय अयोग्य आहे

नागपूर: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार घणाघात केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis slams shiv sena over balasaheb thackeray smriti sthal shuddhikaran)

“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची टोलेबाजी

ज्या लोकांनी हे केले असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणे हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत फडणवीस यांनी या कृतीवर निशाणा साधला. 

अभिमानास्पद! माथेरानच्या मिनी ट्रेनचे युनेस्कोसाठी नामांकन; मध्य रेल्वेने केली शिफारस

ही कृती अतिशय अयोग्य आहे

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

“सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी

ज्यांना गोमूत्र शिंपडायचे आहे, त्यांना शिंपडून द्या

ज्यांना गोमूत्र शिंपडायचे आहे, त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचे मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असे म्हटले पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हते. मी जर त्यांचा पुत्र असतो, तर येऊच दिले नसते. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

दरम्यान, ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले आहे, असे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी सांगितले.  
 

Web Title: bjp devendra fadnavis slams shiv sena over balasaheb thackeray smriti sthal shuddhikaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.