“शरद पवारांनी नेमकं कशासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं?”; भाजपचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:38 PM2021-08-02T12:38:28+5:302021-08-02T12:39:31+5:30

भाजपने खोचक टोला लगावला असून, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक नेमके कशासाठी केले, असा प्रश्न विचारला आहे.

bjp keshav upadhye asked why did sharad pawar appreciated cm uddhav thackeray in bdd chawl programme | “शरद पवारांनी नेमकं कशासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं?”; भाजपचा थेट सवाल

“शरद पवारांनी नेमकं कशासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं?”; भाजपचा थेट सवाल

Next

मुंबई:मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते, मंत्री उपस्थित होते. या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक केले. यावरून भाजपने खोचक टोला लगावला असून, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक नेमके कशासाठी केले, असा प्रश्न विचारला आहे. (bjp keshav upadhye asked why did sharad pawar appreciated cm uddhav thackeray)

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली”; शरद पवारांनी केले उद्धव ठाकरेंचे जाहीर कौतुक

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठे अतिवृष्टीचे संकट आले. हजारो घरे पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. होते नव्हते, ते वाहून गेले, खराब झाले. पण एक गोष्ट चांगली आहे की, या संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी काढले होते. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये टीका केली आहे.

“धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले, पण कशासाठी?

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक? कारण गेले दिड वर्ष भाषणातले शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन व त्यांचं ड्रायव्हिंग या हेच तर जनता पहातेय. ते जे प्रकल्प सुरू करत आहेत ते सुरू केले देवेंद्र फडणवीस यांनी, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात की, लट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर, कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश, ही अपयशाची यादी वाढू शकते, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल, असे स्वप्न कधी पाहिले नव्हते. आता चाळीचा टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिले ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मूळे खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचे घर असायला हवे, तेच आम्ही करतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नमूद केले. 
 

Web Title: bjp keshav upadhye asked why did sharad pawar appreciated cm uddhav thackeray in bdd chawl programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.