भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:12 AM2021-08-16T11:12:32+5:302021-08-16T11:13:47+5:30

मुंबई: गेल्या काही काळापासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत ...

bjp kirit somaiya criticised bhavana gawali on 7 crore cash stolen complaint in police | भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल

भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही काळापासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसैनिक खोडा घालत असल्याबाबत पत्र लिहिल्याने भर पडली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयातून ७ कोटींची कॅश चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावरून भाजपच्या एका नेत्याने टीकास्त्र सोडले असून, भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून, असा मार्मिक सवाल केला आहे. (bjp kirit somaiya criticised bhavana gawali on 7 crore cash stolen complaint in police)

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

एवढी रोख रक्कम आली कुठून?

खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹ ७ कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹ ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान, जुलै २०१९ मध्ये झालेल्या ७ कोटीच्या रोख रकमेच्या चोरीची तक्रार मे २०२० मध्ये पोलीस ठाण्यात नोंदवली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पत्रावर भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली असून, पुलाचे काम आहेत तर ते कोर्टात गेले आहेत. रस्ता चिरलेला आहे. काम खराब झाले आहे. अशा कामांची चौकशी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नितीन गडकरी वाशीम जिल्ह्यात आले होते, तेव्हा रेल्वेच्या उड्डाणपूलासाठी मदतीचे आश्वासन दिले होते. निधी देतो असे म्हटले होते. मी त्यांच्या कानावर काही गोष्टी टाकल्या आहेत. पण त्यात काय चुकीची माहिती गेली हे मी त्यांना भेटून सांगणार आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: bjp kirit somaiya criticised bhavana gawali on 7 crore cash stolen complaint in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.