जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:30 AM2021-02-20T11:30:16+5:302021-02-20T11:31:38+5:30

Ashish shelar on Supriya Sule : आपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, नवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

bjp leader ashish shelar criticize ncp leader mp supriya sule navi mumbai ganesh naik comment about knowing don | जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, शेलार यांचं वक्तव्यनवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी नवी मुंबईत केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. 

"गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय," असं म्हणत शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेवर निशाणा साधला.



काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचं उत्तर द्यावं. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुळे म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते. 

Web Title: bjp leader ashish shelar criticize ncp leader mp supriya sule navi mumbai ganesh naik comment about knowing don

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.