“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:44 AM2020-09-13T11:44:41+5:302020-09-13T11:46:12+5:30

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

BJP leader Ashish Shelar Target Shiv Sena & Sanjay Raut over Navy Officer beaten Controversy | “कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

Next
ठळक मुद्देभाजपा आमदारांचा शिवसेनेवर निशाणा ठाकरे सरकार पुरस्कृत दहशतवाद एक दिवस जनताच पूर्ण ताकदीने ठेचून काढेल भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी शिवसेनेला फटकारलं

मुंबई – निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारल्यानंतर आता या मुद्द्यावरुन भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धोरण असल्याचं शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. त्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे,  संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे? असा टोला त्यांनी शिवसेनाला लगावला आहे.

तर वयोवृद्ध माजी नौदल अधिकाऱ्याला सहा-सात जणांनी मिळून केलेली मारहाण जनतेला भुरट्या गुंडांचा 'षंढपणा' वाटत असली तरी शिवसेनेच्या प्रवक्त्याना मात्र ती 'संतप्त व उत्स्फूर्त' प्रतिक्रिया वाटते आहे. विश्वास ठेवा हा ठाकरे सरकार पुरस्कृत दहशतवाद एक दिवस जनताच पूर्ण ताकदीने ठेचून काढेल अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

हे कायद्याचेच राज्य! महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रीया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे,''असे राऊत यांनी म्हटलं होतं.

तर विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे, हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला, तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे असं शिवसेनेनं भाजपाला सुनावलं होतं.

कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्या

नौदलाच्या निवृत्त अधिकारी मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली होती.

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

 

Web Title: BJP leader Ashish Shelar Target Shiv Sena & Sanjay Raut over Navy Officer beaten Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.