संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?; भाजप नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 12:35 PM2021-03-03T12:35:43+5:302021-03-03T12:39:02+5:30

Pooja Chavan Death Case : रविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोपवला होता राजीनामा

bjp leader atul bhatkhalkar criticize cm uddhav thackeray sanjay rathod pooja chavan death case resignation | संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?; भाजप नेत्याचा सवाल

संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?; भाजप नेत्याचा सवाल

Next
ठळक मुद्देरविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोपवला होता राजीनामापूजाच्या आई-वडिलांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. दरम्यान, राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.  दरम्यान, त्यांचा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे सोपवण्यात न आल्याचं सांगत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला.

"मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा चार दिवसांनंतरही राज्यपालांकडे सोपवला नाही. याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत आणि ते खोटारडे आहेत हे यावरून सिद्ध होत आहे. प्रश्न इतकाच आहे की संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत की मुख्यमंत्री हे संजय राठोडांच्या खिशात आहेत. खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आणि महिलांविषयी असंवेदना प्रगट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा भाजप निषेध व्यक्त करते," असंही भातखळकर म्हणाले. 



राठोडांनी दिला राजीनामा

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.  अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत. 

पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांना भेटले

पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण, आई मंदोदरी व बहीण दिव्याणी यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी नाही. पूजा व आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी केली जात असून, गलिच्छ राजकारण केले जात आहे. संजय राठोड आमच्या समाजाचे नेते आहेत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या उलटसुलट बातम्या येत आहेत, त्या निराधार आहेत. पूजा मृत्यू प्रकरणात आपण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. त्यांना आरोपी ठरवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नका, फक्त संशयावरून त्यांचा बळी जाऊ नये, असे या तिघांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

 

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize cm uddhav thackeray sanjay rathod pooja chavan death case resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.