पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:33 PM2021-04-14T17:33:58+5:302021-04-14T17:36:32+5:30

कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय. रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर

bjp leader atul bhatkhalkar slams sanjay raut over comment doctor compounder coronavirus pune | पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"

पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"

Next
ठळक मुद्दे कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय.रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर

पुणे : जिल्ह्यातील शिरूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कपाऊंडर बोगस डॉक्टर बनून २ वर्षापासून २२ बेडचं हॉस्पिटल चालवत होता. एवढंच नाही तर त्यानं कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्डही बनवला होता. ज्यात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. हा कंपाऊंडर डॉक्टरकीचं बनावट डिग्री आणि नावानं लोकांची फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, यावरुन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. 

"पुणे जिल्ह्यात बनावट डिग्रीच्या मदतीने एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्याचा पराक्रम या दोन वर्षापासून एका कंपाऊंडरने केला. कोरोना रुग्णांवरदेखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्रोत हाच असावा बहुधा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.



काय आहे प्रकरण?

पोलिसांनी सांगितल्यानुसार, बनावट डिग्री आणि नावासह हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षापासून सुरू होतं. ज्यावेळी आरोपीने एका व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली. तेव्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहचलं. तेव्हा प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांना या घटनेचा तपास सुरू केला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

या आरोपीचं नाव मेहबूब शेख असं आहे. तो महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी नांदेडला राहणारा असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर त्याने बनावट हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार केला आणि त्याच्या जोडीला त्याने आणखी एका सहकाऱ्याला घेतलं.

या दोन्ही पार्टनरमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिसांकडे हे प्रकरण पोहचल्यानं प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपीने बोगस प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही बनवली होती. 

Web Title: bjp leader atul bhatkhalkar slams sanjay raut over comment doctor compounder coronavirus pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.