"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:28 PM2021-03-31T12:28:58+5:302021-03-31T12:35:33+5:30

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial : स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial | "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

Next

मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुरावा वाढला आहे. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं" असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन... निमंत्रण पत्रिकेतून 'हिंदुहृदयसम्राट' गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब... नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची" असं म्हणत ठाकरे सरकारवर अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. 

दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास,  दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या स्मारकाबद्दल सुभाष देसाईंनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देसाईंनी दिली आहे.

 

Web Title: BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.