"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय" 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:21 PM2021-04-15T12:21:36+5:302021-04-15T12:28:03+5:30

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Aurangabad Saloon Owner Death : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Aurangabad Saloon Owner Death | "मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय" 

"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय" 

Next

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका सलूनचालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या उस्मानपुरा येथे घडली. मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे. 

"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय" असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी गुरुवारी (15 एप्रिल) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे." असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

कोरोना नियम मोडणाऱ्या सलून चालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, दुकान उघडले म्हणून उस्मानपुरा येथील एका हेअर सलून चालकावर दरम्यान पोलीस कारवाई करण्यात होती. दरम्यान, त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना तो खाली पडून जखमी होऊन मरण पावला. नातेवाईकांनी प्रेत उस्मानपुरा ठाण्यात नेले. फेरोज खान कदीर खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.  फिरोज खान याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. फेरोजला मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत हजारो नागरीक आणि नातेवाईक उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. ठाण्याच्या दारात प्रेत ठेवून आंदोलन केले. जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत प्रेत येथून उचलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.  

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं", भाजपाचा सणसणीत टोला

अतुल भातखळकर यांनी याआधीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला होता. "घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी याआधीही निशाणा साधला होता. "मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा" असं म्हटलं होतं. 

 

Web Title: BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Aurangabad Saloon Owner Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.