Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:53 AM2021-06-01T11:53:46+5:302021-06-01T11:54:18+5:30

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत.

BJP Leader Devendra Fadnavis meet BJP MP Raksha Khadse daughter in law of  Eknath Khadse at Muktainagar Jalgaon Maharashtra | Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

Next

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्यासोबत यावेळी भाजप नेते गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस आज थेट जळगावात रक्षा खडसेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदात जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी केली. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष बांधणी संदर्भात फडणवीस यांची रक्षा खडसे यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्याच आठवड्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या आजी-माजी १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या संदर्भात देखील फडणवीस रक्षा खडसे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं समजतं. 
 

Web Title: BJP Leader Devendra Fadnavis meet BJP MP Raksha Khadse daughter in law of  Eknath Khadse at Muktainagar Jalgaon Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.