...अन् फडणवीसांनी ताफ्याची दिशाच बदलली; गाडी अचानक 'त्या' दिशेनं वळवली
By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 09:30 AM2020-10-22T09:30:57+5:302020-10-22T09:32:43+5:30
Devendra Fadnavis Eknath Khadse: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खडसेंनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. खडसेंनी फडणवीसांवर अतिशय गंभीर आरोप केले. याबद्दल फडणवीस यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मात्र खडसेंच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.
भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा
सध्या देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. पुणे, सोलापूर, मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागांचा आढावा घेण्याचं काम फडणवीस यांच्याकडून सुरू आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी पावलं उचलत असल्याचं दिसून येत आहे. इतर पक्षांतून आलेले नेते आणि भाजपचे निष्ठावंत नेते अशा दोन्हींची मर्जी सांभाळण्याचं काम फडणवीस सध्या करत आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यात याचा प्रत्यय आला.
एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर
इतर पक्षातून भाजपत दाखल झालेल्या नेत्यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं. यामध्ये राहुल कुल, रणजीतसिंह निंबाळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. मात्र फडणवीस यांनी दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बीडमधल्या गोपीनाथ गडावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. फडणवीस गोपीनाथ गडावर गेल्यानं जुन्या कार्यकर्त्यांना सुखद धक्का बसला. त्यामुळे फडणवीस सध्या आयारामांसोबतच निष्ठावंतांनाही सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात येणार असल्यानं भाजप नेत्या आणि आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी नांदेडचा दौरा रद्द केला. त्या फडणवीस यांच्यासोबत दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. गोपीनाथ गडावरील मेळाव्यालादेखील खडसे उपस्थित होते. तिथे त्यांनी भाषणही केलं होतं. त्यामुळे खडसे नाराज असताना मुंडे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पंकजा मुंडे मराठवाडा दौऱ्यात फडणवीस यांच्यासोबत होत्या. त्यामुळे फडणवीस पक्षांतर्गत विरोधकांसोबत जुळवून घेत असल्याचं दिसत आहे.