दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:17 PM2020-09-02T16:17:36+5:302020-09-02T16:23:15+5:30

मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं का याचा शोध घेणार; खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

bjp leader eknath khadse hits out at his own party laaders | दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

Next

जळगाव: भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता हल्ला चढवला आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आपल्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. त्यावरूनही खडसेंनी फडणवीस यांना टोला लगावला. 'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत खडसेंनी फडणवीस यांना नाव न घेता लक्ष्य केलं. 

ब्लॅक टॉपसाठी चीनचा आटापिटा; तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न; जाणून घ्या महत्त्व

'एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं. राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकूल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे,' अशा शब्दांत खडसेंनी स्वपक्षातल्या काही नेत्यांना लक्ष्य केलं.

चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

माझ्यावर पक्षानं अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं खडसे म्हणाले. 'मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र तरीही पक्षानं माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावं असा कधीही मनात विचार आला नसल्याचं खडसे म्हणाले.

पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल, असं भाकीत भाजपचे खासदार नारायण राणेंसह यांच्यासह अनेक जण व्यक्त करतात. त्यावरही खडसेंनी भाष्य केलं. सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून एक दीड वर्ष उलथापालथ होईल असं वाटत नाही. आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे. भाजपला जर सत्तेत यायचं असल्यास काही आमदार फोडून चालणार नाही, तर एखादा पूर्ण पक्ष भाजपमध्ये यायला हवा. मात्र ही भाबडी आशा आहे, सध्या तरी असं होईल अशी परिस्थिती नाही, असं खडसे म्हणाले.

Web Title: bjp leader eknath khadse hits out at his own party laaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.