Tamil Nadu BJP: भाजपा नेत्यानेच व्हायरल केला बड्या नेत्याचा स्वपक्षीय महिला नेत्यासोबतचा अश्लिल व्हिडीओ, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:04 PM2021-08-25T12:04:11+5:302021-08-25T12:31:23+5:30

Tamil Nadu BJP News: भाजपाचे तामिळनाडूमधील सरचिटणीस के.टी. राघवन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातीलच अन्य नेत्याने यूट्युबवर एक  स्टिंग व्हिडीओ शेअर केल्यानंतर राघवन यांनी राजीनामा दिला आहे.

BJP leader goes viral with sting video of big leader with his own Party female leader in Tamil Nadu | Tamil Nadu BJP: भाजपा नेत्यानेच व्हायरल केला बड्या नेत्याचा स्वपक्षीय महिला नेत्यासोबतचा अश्लिल व्हिडीओ, आता...

Tamil Nadu BJP: भाजपा नेत्यानेच व्हायरल केला बड्या नेत्याचा स्वपक्षीय महिला नेत्यासोबतचा अश्लिल व्हिडीओ, आता...

googlenewsNext

चेन्नई - भाजपाचेतामिळनाडूमधील सरचिटणीस के.टी. राघवन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातीलच अन्य नेत्याने यूट्युबवर एक  स्टिंग व्हिडीओ शेअर केल्यानंतर राघवन यांनी राजीनामा दिला आहे. (Tamil Nadu BJP News) या व्हिडीओमध्ये राघवन यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती स्वपक्षीय महिल्या कार्यकर्तीसोबत अश्लिल व्हिडीओ कॉलमध्ये गुंतली असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पक्षाचे नेते मदन रविचंद्रन यांनी युट्युबवर प्रसारित केले आहे. मात्र लोकमत.कॉम या व्हि़डीओच्या सत्यतेला दुजोरा देत नाही. (BJP leader goes viral with sting video of big leader with his own Party female leader in Tamil Nadu )

दरम्यान, के.टी. राघवन यांनी एक ट्विट करून या प्रकरणातील आपला सहभाग फेटाळून लावला आहे. तसेच याविरोधात कायदेशारी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, तामिळनाडूमधील जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि जे माझ्यासोबत आहेत त्यांना मी कोण आहे ते माहीत आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता काम करत आहे.

आज सकाळी मला सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओबाबत समजले. हा व्हिडीओ माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे. मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच हे आरोप फेटाळून लावत आहे. अखेरीस न्यायाचाच विजय होणार आहे.

दरम्यान, मदन डायरी या आपल्या यूट्युब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या रविचंद्रन यांनी त्यांच्या टीमकडे असे १५ व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. हे व्हिडीओ पुढच्या काही दिवसांत जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. एनडीटीव्ही रिपोर्टनुसार रविचंद्रन यांनी दावा केला आहे की, त्यांना या स्टिंग ऑपरेशनची कल्पना भाजपा नेत्यांकडून लैंगिक शोषण आणि बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यात येत असल्याच्या आरोपांनंतर सुचली. माझा हेतू पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

मात्र भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी रविचंद्रन यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच त्यांचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले. आम्ही या आरोपांकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच पक्षाच्या राज्य सचिव श्रीमती मलारकोडी यांच्या नेतृत्वाखाली चौकशीसाठी एका समितीची नियुक्ती होईल. ही समिती आयोपांमागील सत्यता पडताळून पाहील. त्यानंतर ज्या लोकांना दोषी पाहिले जाईल. त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल.

दरम्यान, प्रशासकीय कारवाईमुळे चिंतीत असलेले रविचंद्रन आणि त्यांचे सहकारी वेन्बा यांनी सांगितले की, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्यांना धमवाकवण्यात येत आहे. वेन्बा यांनी दावा केला की व्हिडीओ कॉलमध्ये दिसत असलेली महिला पक्षाची जिल्हास्तरीय नेता आहे. महिलांचे संरक्षण आणि सन्मानासाठी अशा प्रकारच्या मुद्यांवर आम्हाला पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी केले.   

Web Title: BJP leader goes viral with sting video of big leader with his own Party female leader in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.