“उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, सगळे हिशोब इथेच द्यावे लागतील”; भाजपा नेत्याचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:16 PM2021-03-12T17:16:53+5:302021-03-12T17:18:35+5:30
BJP Kirit Somaiya Criticized Thackeray Government: शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे
मुंबई – अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे.(BJP Kirit Somaiya Target CM Uddhav Thackeray & Rashmi Thackeray)
शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. नाईक कुटुंबाने पत्रकार परिषदेत जमीन खरेदीविक्री आमचा व्यवसाय असल्याचं सांगितलं, पण मुख्यमंत्र्यांचाही तोच व्यवसाय आहे यावर कोणी बोलत नाही, रश्मी ठाकरेंनी ८ वर्ष कर भरला नाही, पैशांची अफरातफर होत असेल तर बोलावेच लागेल, उद्धव ठाकरे गाठ किरीट सोमय्याशी आहे, सगळे हिशेब घ्यावेच लागतील असं त्यांनी सांगितले असं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे.
२४ तासांत ५ हजार बेडचे हॉस्पिटल विकत घेण्याचा कारभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने स्वास कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जागा नावाने करून अवघ्या २४ तासात तिच जागा पुन्हा सरकारने विकत घेण्याचा कारभार म्हणजे शिवसेनेची आणि ठाकरे सरकारची कमाल आहे, २० जुलै २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना मुलुंडची जागा हॉस्पिटलच्या नावानं ताबडतोब विकत घेण्याची सूचना केल्या. ८ ऑक्टोबर रोजी हीच जागा स्वास कन्स्ट्रक्शनच्या नावाने करण्यात आली होती.
COVID & Corruption Multiplying in Thackeray Sarkar. Land Owned by Maharashtra Govt, transferred to Swas Builders @ ₹62 Crore to Buy Back @ ₹2106 Crore for 5000 Bed Hospital @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@BJP4Indiapic.twitter.com/Ysi1BD5oQS
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 12, 2021
मुंबई महापालिका आयुक्तांनी २४ तासांत महाराष्ट्र सरकारला ही जागा २ हजार १०६ कोटींना रुपयांत घेण्याचा अहवाल पाठवला, मालकी हक्क रुपांतर करण्यासाठी बाजारभाव ६१ कोटी आणि तीच जागा विकत घेण्यासाठी २ हजार १०६ कोटी रुपये, हे ६२ कोटी रुपये कुठून आले? कोणी भरले, हा निर्णय कोणी घेतला? कसा घेतला? जिल्हाधिकाऱ्यांकडे फाईलची मागणी केल्यावर ही फाईल उपलब्ध नाही असं उत्तर आलं, उद्धवा अजब तुझे सरकार अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले आहेत.