"प्रताप सरनाईकांना नेमकी कोणाची भीती वाटतेय? कोरोनाची की ईडीची?"
By कुणाल गवाणकर | Published: November 25, 2020 02:19 PM2020-11-25T14:19:21+5:302020-11-25T14:45:40+5:30
ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
मुंबई: शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) टाकलेल्या छाप्यांमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. ईडीच्या धाडींमुळे माझं तोंड बंद होणार नाही, असा आक्रमक पवित्रा सरनाईक यांनी घेतला होता. मात्र ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे. आता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
I heard that Shivsena Leader Pratap Sarnaik not attending ED today He said he is Quarantined himself! Is he scared of COVID or ED or Money Laundering & Benami Transactions? Will CM Udhhav Thackeray will ask All Persons to get Quarantine whom Sarnaik met yesterday? @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 25, 2020
तुम्हाला ईडीची नोटीस आली का?; हडप्पा, मोहंजोदडोचा संदर्भ देत राऊत म्हणाले...
सरनाईक यांनी ईडीला केलेल्या विनंतीवरून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. 'शिवसेना नेते प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीला जात नसल्याचं समजलं. आपण क्वारंटिन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना कोरोनाची भीती वाटतेय की ईडीची? त्यांना मनी लॉण्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांची भीती वाटतेय का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल सरनाईक यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटिन होण्यास सांगणार का?' असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले आहेत.
Thackeray Sarkar's Leaders trying to create pressure to Cover Corruption? Benami Transactions? Shivsena Leader Pratap Sarnaik has to Response ED Queries about Foreign Properties, Relations with Scamster, Non Transparent Income No Body Above the Law @Dev_Fadnavis@BJP4Maharashtrapic.twitter.com/iCiAv0zAf2
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 25, 2020
भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण
ईडीला सरनाईकांची विनंती
सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारंटिन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केल्याचं वृत्त आहे. ईडीनं प्रताप सरनाईक यांना समन्स बजावून आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं.
रिक्षा चालक ते १२६ कोटींचा मालक; जाणून घ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा प्रवास
सरनाईक यांचा आक्रमक पवित्रा
ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'
ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 'या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,' अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती.
'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'
'ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे', असं प्रताप सरनाईक म्हणाले होते.