"नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय", कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:27 AM2021-03-01T11:27:57+5:302021-03-01T12:14:23+5:30

Night life in Mumbai : आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करत आज मनसेने मुंबईमध्ये कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आणले होते.

BJP Leader Nilesh Rane Criticize Aditya Thackeray for night life in Mumbai | "नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय", कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून घणाघाती आरोप

"नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय", कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून घणाघाती आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देआदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत. त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहेमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाहीनाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्यांचेच मित्र हे क्लब चालवतात

मुंबई - एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ (night life in Mumbai) शेअर करत आज मनसेने (MNS) मुंबईमध्ये कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आणले होते. त्यानंतर भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. (BJP Leader Nilesh Rane Criticize Aditya Thackeray for night life in Mumbai )

आदित्य ठाकरेंवर टीका करताना केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत. त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाही. नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्यांचेच मित्र हे क्लब चालवतात, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केला आहे. 



दरम्यान, मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे. या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर (Shiv Sena Leader Aditya Thackeray) निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?', असा सवाल धुरींनी उपस्थित केला.

मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केलं. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. 'आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,' असं धुरी म्हणाले होते.

Web Title: BJP Leader Nilesh Rane Criticize Aditya Thackeray for night life in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.