राजकारण तापलं! 'मी भ्रष्टाचारी नाही', भाजपा नेत्याने मंदिरात जाऊन घेतली शपथ; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:52 AM2021-08-11T11:52:46+5:302021-08-11T12:00:59+5:30
BJP leader oath in temple corruption charges andhra pradesh chittoor : वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) भाजपा आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. यावरून राजकारण तापलं आहे. आपल्यावर झालेल्या आरोपानंतर भाजपाचे नेते एका मंदिरात पोहोचले आणि तिथे 'मी भ्रष्टाचारी नाही' अशी शपथ घेतल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे नेते जी. विष्णुवर्धन रेड्डी चित्तूर जिल्ह्यातील विनायकस्वामी मंदिरात पोहोचले. जिथे त्यांनी देवासमोर 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच भ्रष्टाचार केला नसल्याची शपथ घेतली आहे. प्रॉद्दातूर परिसरातील टिपू सुलतानच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. भाजपा याला विरोध करत आहे आणि स्थानिक प्रशासनाला पुतळा बसवू देत नाही. ज्यानंतर वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपा नेत्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
वादविवादानंतर गेल्या आठवड्यात भाजपा नेत्याने आव्हान दिलं होतं की, ते भ्रष्ट नसल्याची मंदिरात देवासमोर येऊन शपथ घेतील. त्यांनी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यालाही असं करण्यास सांगितलं. मात्र, जेव्हा आमदार मंदिरात पोहोचले नाहीत, तेव्हा मंदिरात न येण्याचा अर्थ नेमका काय काढायचा हे लोकांवर सोपवू असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या राजकारणात हे असं पहिल्यांदा झालेलं नाही. याआधीही नेते मंडळींनी एकमेकांवर निशाणा साधताना देवाचा आधार घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! परिसरात खळबळ उडाली असून या भयंकर घटनेने राजकारण तापलं #crime#BJP#TMC#Policehttps://t.co/9CbDjCHRgW
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2021
खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे.
धक्कादायक! भाजपा नेत्याच्या हत्येने परिसरात खळबळ#Crime#BJP#Policehttps://t.co/JRNPWqgO2r
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2021
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भाजपा नेत्याचं अजब विधान#coronavirus#ShivrajSinghChouhan#BJP#TarunChughhttps://t.co/40tJVCSRMbpic.twitter.com/TV0rpWJ4LE
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2021