बार, रेस्तराँ उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?; प्रसाद लाड यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:03 PM2021-03-20T20:03:25+5:302021-03-20T20:11:46+5:30

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी दरमहा वाझेंना १०० कोटी गोळा करण्यास सांगितल्याचा केला आरोप

bjp leader prasad lad criticize home minister anil deshmukh on former cp parambir singh sachin vaze name alligation | बार, रेस्तराँ उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?; प्रसाद लाड यांचा खोचक सवाल

बार, रेस्तराँ उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?; प्रसाद लाड यांचा खोचक सवाल

Next
ठळक मुद्देपरमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी दरमहा वाझेंना १०० कोटी गोळा करण्यास सांगितल्याचा केला आरोपविरोधकांकडून अनिल देशमुखांवर जोरदार टीका

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक  त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील पत्र लिहिलं आहे. यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी बार, रेस्तराँ यासाठी उघडण्याची घाई केली होती का? असा खोचक सवाल करत जोरदार टीका केली.

"अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो, महिन्याला १०० कोटी?, अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे? बार, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?, यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी," असं म्हणत प्रसाद लाड यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. 



काय आहेत पत्रातील मुद्दे?

मार्च महिन्याच्या मध्यात वर्षा बंगल्यावर मी तुमची भेट घेतली. त्या ठिकाणी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली. इतकंच नाही तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या अन्य मंत्र्यांना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं. 

सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. गेल्या अनेक महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दरमहा १०० कोटी जमा करण्यास सांगितली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितलं. त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे गोळा करण्यासाठी काय करायचं हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितलं. मुंबईत १७५० बार आणि रेस्तराँ आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.  

Web Title: bjp leader prasad lad criticize home minister anil deshmukh on former cp parambir singh sachin vaze name alligation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.