"देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा; त्यांनी बलाढ्य चीनलाही नमवलंय"

By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 03:52 PM2020-09-22T15:52:38+5:302020-09-22T15:55:05+5:30

जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्यातल्या जनतेला कोणती मदत केली?

bjp leader radhakrishna vikhe patil praises pm narendra modis work | "देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा; त्यांनी बलाढ्य चीनलाही नमवलंय"

"देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा; त्यांनी बलाढ्य चीनलाही नमवलंय"

Next

अहमदनगर: देशाचा जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेसाठी अहोरात्र केलेल्या कामाचा विचार करायला हवा. त्यांनी चीनसारख्या बलाढ्य देशालाही नमवलं आहे, अशा शब्दांत भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्यातल्या जनतेला कोणती मदत केली, असा सवाल करत पाटील यांनी विरोधकांना केला.

"मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास"

पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सेवा सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या आशा सेविकांना विखे-पाटील यांच्या सहकार्यानं विमा पॉलिसींचं वितरण करण्यात आलं. यावेळी विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत पंतप्रधानांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. 'कोरोना काळात ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती, तेच घरात बसल्‍यामुळे सामान्‍य माणसाच्‍या हितासाठी कोणतंही काम राज्‍यात झालं नाही. याउलट पंतप्रधान मोदींनी संकटाच्‍या काळात सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रिया राबवली. २० लाख कोटी रुपयांचं आत्‍मनिर्भर भारत पॅकेज जाहीर करुन उद्योजकांपासून ते पथविक्रेत्‍यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांना योजना देऊन हा देश पुन्‍हा आत्‍मविश्‍वासाने पुढे नेण्याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला,' अशा शब्दांत विखे-पाटील यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह

देशाचा विकास दर (जीडीपी) खाली आला म्‍हणून मोदींच्‍या नावाने ओरडणाऱ्यांनी मागील सहा महिन्‍यांत राज्‍यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याबद्दल आत्‍मपरीक्षण करावं, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. मोदींच्‍या निर्णयक्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला. त्यामुळेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्‍यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्‍याचा निर्णय घेतला. आशा सेविकांना विमा पॉलिसीचं संरक्षण देण्‍याचा राज्यातील पहिला उपक्रम या निमित्ताने संपन्ना झाला,' असंही विखे पाटील म्हणाले.

Web Title: bjp leader radhakrishna vikhe patil praises pm narendra modis work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.