Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:20 PM2021-02-23T15:20:32+5:302021-02-23T15:22:04+5:30

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ((Pravin Darekar)) यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

bjp leader slams sanjay rathod over pooja chavan suicide case | Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका 

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका 

Next
ठळक मुद्देसंजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय - प्रवीण दरेकरसंजय राठोड यांचा सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रवीण दरेकरराजकारण करण्याचा प्रश्नच नाही - प्रवीण दरेकर

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ((Pravin Darekar)) यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. (bjp leader slams sanjay rathod over pooja chavan suicide case)

सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. ती आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा मृत्यूचे कारण काय याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

संजय राठोड यांनी कृत्याची कबुली द्यावी, समाजाची दिशाभूल करू नये: शांताबाई राठोड

सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न

संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. संजय राठोड म्हणतात की ते १० दिवस काम करत होते. मात्र, मंत्रीमंडळ बैठका तर झालेल्या दिसल्या नाही. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

राजकारण करण्याचा प्रश्नच नाही

संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे. यात राजकारण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल केले जातात. मात्र, या प्रकरणात १५ दिवस झाले तरी गुन्हा दाखल केलेला नाही. संजय राठोड यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. 

चित्रा वाघ यांचीही टीका

आताच्या घडीला बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला साजेसे नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरले. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचे हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं म्हटलं. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

Web Title: bjp leader slams sanjay rathod over pooja chavan suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.