"...म्हणून भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग नाही", आमदाराने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:42 PM2021-03-22T12:42:06+5:302021-03-22T12:55:58+5:30

BJP leaders haven’t got Covid as they work hard, claims Gujarat MLA : गुजरातमधील भाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे.

BJP leaders haven’t got Covid as they work hard, claims Gujarat MLA; later backtracks | "...म्हणून भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग नाही", आमदाराने सांगितलं कारण

"...म्हणून भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग नाही", आमदाराने सांगितलं कारण

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे, गेल्या महिन्यात स्थानिक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली होती.

अहमदाबाद : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढत होताना दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारांकडून विविध उपाय-योजना आखल्या जात आहे. असे असताना गुजरातमधीलभाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात, त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे विधान गुजरातमधील राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे भाजपा आमदार गोविंद पटेल यांनी केले आहे. (BJP leaders haven’t got Covid as they work hard, claims Gujarat MLA; later backtracks)

रविवारी गोविंद पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल गोविंद पटेल यांना विचारण्यात आला. यावर "जे खूप मेहनत करतात त्यांना करोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही", असे उत्तर गोविंद पटेल यांनी दिले.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात स्थानिक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली होती. विजय रुपाणी यांच्यव्यतिरिक्त पक्षाचे राज्य युनिटचे प्रमुख सी आर पाटील आणि सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांसह अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. याचबरोबर, कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वडोदरा येथील भाजप खासदार रंजनबेन भट्ट यांनी शनिवारी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी स्थानिक निवडणुका आणि अहमबादामध्ये कसोटी तसेच टी-२० मालिका आयोजित केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावाचा फेटाळून लावला आहे. "संविधानातील तरतुदींनुसार स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. क्रिकेटचे सामने केवळ अहमबादामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीला या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकाही झाल्या नाहीत आणि क्रिकेटचे सामनेही झाले नाहीत. मात्र देशामध्ये कोरोना संसर्गाची रोजची जी आकडेवारी समोर येत आहे, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत," असे नितीन पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये एका आठवड्यात १ हजार ५८० नवे रुग्ण आढळून आले. २८ नोव्हेंबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. गुजरातमध्ये मागील सात दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीनंतरची ही राज्यातील सर्वाधिक वाढ आहे.
 

Web Title: BJP leaders haven’t got Covid as they work hard, claims Gujarat MLA; later backtracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.