महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, नवाब मलिकांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:35 PM2021-08-08T18:35:21+5:302021-08-08T18:37:57+5:30
Nawab Malik : भाजपा नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, हे सिद्ध होत आहे. हे जनहितासाठी की मतासाठी सुरु आहे, याचे उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
मुंबई : कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजपा नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, हे सिद्ध होत आहे. हे जनहितासाठी की मतासाठी सुरु आहे, याचे उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
भाजपाचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याच पद्धतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत, या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिन्याभरापासून जोर धरू लागली आहे.
तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. #NeerajChopra#UddhavThackerayhttps://t.co/yBSuqbrJb2@OfficeofUT@CMOMaharashtra@ShivSena
— Lokmat (@MiLOKMAT) August 8, 2021
"सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते"
सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.