"मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?", भाजपाचा रोखठोक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:41 PM2021-03-01T17:41:56+5:302021-03-01T17:44:20+5:30
BJP Maharashtra Slams Sanjay Rathod And Thackeray Government : राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई - पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधाला आहे.
भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राठोड आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. तसेच विविध सवाल देखील उपस्थित करण्यात आले आहेत. "काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत" असं भाजपाने म्हटलं आहे.
बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का? @OfficeofUT@AnilDeshmukhNCP@SanjayDRathodspic.twitter.com/wviApYSpUF
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021
"पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार?, सत्य जनतेला कधी कळणार?"
"मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?, बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?" असा सवाल भाजपाने विचारला आहे. तसेच "पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.
पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार? @OfficeofUT@AnilDeshmukhNCP@SanjayDRathodspic.twitter.com/HRaKVkKVQK
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021
"फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"
"फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली?. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे असं सांगितलं जात होतं. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते?" असा सवाल शेलार यांनी केला आहे.
काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत. @OfficeofUT@AnilDeshmukhNCP@SanjayDRathodspic.twitter.com/68DJ0XzZoT
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021