"कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावे’’ भाजपा आमदाराचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:14 PM2021-07-14T20:14:36+5:302021-07-14T20:15:48+5:30

Maharashtra Politics: पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचा चेहराच योग्य आहे असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते.

BJP MLA Atul Bhatkhalkar said, "Sanjay Raut should first decide who will be the permanent future Prime Minister," | "कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावे’’ भाजपा आमदाराचा खोचक टोला

"कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावे’’ भाजपा आमदाराचा खोचक टोला

Next

मुंबई - राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज गांधी कुटुंबीयांची भेट घेतल्याने दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणात घडामोडींना वेग आला असतानाच विरोधी पक्षांकडे चेहरा नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांचा चेहराच योग्य आहे असे विधान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. आता या विधानावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर ( BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. ( BJP MLA Atul Bhatkhalkar said, "Sanjay Raut should first decide who will be the permanent future Prime Minister,")

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे. कधी ते उद्धव ठाकरेंच्या कोपराला गुळ लावतात, तर कधी शरद पवारांच्या, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.

दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडी टक्कर द्यायची असेल तर शरद पवारांना पुढे करावं लागेल असं म्हटलं जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, भाजपाविरोधी आघाडी बनवायची असेल तर सध्या विरोधी पक्षाकडे चेहरा नाही. पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवारच योग्य चेहरा आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

विरोधकांची आघाडी बनवून मोदींना पर्याय उभा करायचा असेल तर शरद पवार चेहरा आहेत. तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. शरद पवारांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. देशपातळीवर असा प्रयोग करायचा असेल तर शरद पवार सर्वमान्य चेहरा आहे. तेच योग्य ठरतील असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar said, "Sanjay Raut should first decide who will be the permanent future Prime Minister,"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.