“…मग इथं शाखाप्रमुख कुठं दिसत नाही?, शिवसेनेतील बाटग्यांची मोठी यादी”; नितेश राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:57 AM2021-08-02T09:57:18+5:302021-08-02T09:57:44+5:30
आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना आहे .बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई – वेळ आली तर सेनाभवन फोडू या भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते भाजपावर शरसंधान साधत आहेत तर भाजपातील नेतेही आक्रमकपणे शिवसेनेला प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. यातच आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने केलेल्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.
भाजपा आमदार नितेश राणेंनी ट्विट करून म्हटलंय की, मराठी माणसाची संघटना म्हणे मग BEST च्या जागा – कनाकीय, BMC कॉन्ट्रॅक्ट - दिनो मोरिया, रात्रीच्या पार्ट्या – पटानी,कपुर आणि जॅकलीन मग यात इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत? मराठी माणूस दिसत नाही? असा सवाल राणेंनी उपस्थित करत डाके, रावते, रामदास कदम, विजय शिवतारे, राजन साळवी, सुनील शिंदे सारखे जुने शिवसैनिक दिसणार नाहीत. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची असा टोला शिवसेना नेते संजय राऊतांना हाणला आहे.
शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहिती साठी..
— nitesh rane (@NiteshNRane) August 2, 2021
सचिन आहीर - bks ची जबाबदारी
राहुल कनाल - शिर्डी संस्था
आदेश बांदेकर - सिद्धिविनायक संस्था
उदय सामंत - कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार - मंत्री
प्रियांका चतुर्वेदी - खासदार
यादी मोठी आहे..
इथे कुठेही..
तसेच शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी अशी की सचिन आहीर - BKS ची जबाबदारी, राहुल कनाल - शिर्डी संस्था, आदेश बांदेकर - सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत - कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी खासदार ही यादी मोठी आहे. इथे कुठेही शाखाप्रमुख, शिवसैनिक दिसत नाही असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे. तर नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय ? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना आहे .बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मराठी माणसाची संघटना म्हणे..
— nitesh rane (@NiteshNRane) August 2, 2021
मग..
BEST च्या जागा - कनाकीय
Bmc कॉन्ट्रॅक्ट - दिनो
रात्रीच्या पार्ट्या - पटानी ..कपुर .. Jaqueline..
इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत ?
मराठी माणूस दिसत नाही ?
काय आहे सामना अग्रलेखात?
सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. जी शिवसेना घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. @ShivSena@BJP4Maharashtrahttps://t.co/OykItRJNLK
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021
त्याचसोबत भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला. शिवतीर्थावरील एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्पितळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा. शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही असा इशाराही भाजपाला देण्यात आला आहे.
....तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर, शिवसेनेचा भाजपाला थेट इशारा @ShivSena@BJP4Maharashtra@PrasadLadIndhttps://t.co/43VuMr5o3b
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021