Babul Supriyo: बाबुल सुप्रियोंनी फसवले; राजीनाम्यानंतर दत्तक गावच्या रहिवाशांनी मुंडन केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:23 PM2021-08-02T18:23:06+5:302021-08-02T18:28:33+5:30

Babul Supriyo controversy, west bengal: काही ग्रामस्थांनी सांगितले की, बाबुल सुप्रियो यांनी या गावात एक हॉस्पिटल, एक मोठी शाळा बनविण्याची घोषणा केली होती. मात्र, दोनदा खासदार झाले तरीदेखील काहीच केले नाही, पुढेही काही होणार नाही. 

BJP MP Babul Supriyo Adopted siddhbadi village; villagers head shaved after resignation | Babul Supriyo: बाबुल सुप्रियोंनी फसवले; राजीनाम्यानंतर दत्तक गावच्या रहिवाशांनी मुंडन केले

Babul Supriyo: बाबुल सुप्रियोंनी फसवले; राजीनाम्यानंतर दत्तक गावच्या रहिवाशांनी मुंडन केले

Next

दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची तसेच खासदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात राहण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले होते. तसेच भाजपाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावानेच त्यांना हातचा आरसा दाखविला आहे. (BJP MP Babul Supriyo Adopted siddhbadi village; villagers head shaved after resignation)

Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

एकीकडे भाजपाकडूनबाबुल सुप्रियो यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे त्यांनी दत्तक घेतलेल्या गावच्या रहिवाशांनी मुंडन करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बर्दवान जिल्ह्य़ातील सालानपूर ब्लॉकमध्ये देंदुआ पंचायतीच्या सिद्धबाडी गाव बाबुल सुप्रियो यांनी मोदींच्या घोषणेनुसार दत्तक घेतले होते. सुप्रियो यांनी सोलार लाईट, रस्ते आणि सबमर्सिबल पंपासह अनेक गोष्टी करण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टी सोडता अन्य काहीच त्यांनी केले नसल्याचा आरोप गाववाल्यांनी केला आहे. आम्ही राजकारणाचे शिकार झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Anand Mahindra: पी. व्ही. सिंधूसाठी मागितली थार; आनंद महिंद्रांनी युजरला असे उत्तर दिले, की झाला गपगार...

काही ग्रामस्थांनी सांगितले की, बाबुल सुप्रियो यांनी या गावात एक हॉस्पिटल, एक मोठी शाळा बनविण्याची घोषणा केली होती. मात्र, दोनदा खासदार झाले तरीदेखील काहीच केले नाही, पुढेही काही होणार नाही. 


सिद्धबाडी गावातील रहिवासी अमर मंडल आणि विनोद दास यांनी सोमवारी सकाळी आपले मुंडन केले. बाबुल यांनी जी आश्वासने दिलेली ती आजवर पूर्ण केली नाहीत. त्यांनी गावाला वडिलांसारखे मांडीवर घेतलेले, आता त्यांच्या जाण्यामुळे गाव अनाथ झाले. यामुळे आम्ही मुंडन करून आपले दु:ख व्यक्त केले आहे. 

यावरून देखील राजकीय धुळवड सुरु झाली आहे. भाजपाचे गावातील नेते तीर्थ सेन यांनी सांगितले की, रस्ते, गटारे, शौचालये तसेच महिलांसाठी हस्तशिल्प प्रशिक्षण, पुरुषांसाठी मच्छी पालन आदी सुविधा दिल्या आहेत. तरीदेखील काही लोक काहीच केले नसल्याचे सांगत आहेत. यामध्ये राजकीय हेतू लपलेला आहे. 

Web Title: BJP MP Babul Supriyo Adopted siddhbadi village; villagers head shaved after resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.