आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचं; 'सरकार स्थापने'वर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:30 PM2021-03-29T19:30:47+5:302021-03-29T19:39:50+5:30

bjp mp narayan rane on ncp chief sharad pawar and amit shahs meeting: गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

bjp mp narayan rane on ncp chief sharad pawar and amit shahs meeting | आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचं; 'सरकार स्थापने'वर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचं; 'सरकार स्थापने'वर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते भेटीच्या वृत्ताचं खंडन करत असताना दुसरीकडे खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये शहा आणि पवार यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडली

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते शरद पवार-अमित शहांची भेट झालीच नसल्याचं सांगत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होणार का, अमित शहा-शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय, असे प्रश्न भाजप खासदार नारायण राणेंना विचारण्यात आले. त्यावर वरून कसा आदेश येतो ते आता बघायचं. वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची, असं उत्तर राणेंनी दिलं.

पवार-शहा भेटीच्या चर्चेनंतर भाजपा आमदाराने शेअर केला 'तो' व्हिडिओ

अँटिलिया स्फोटकं प्रकरण, सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ माजली. मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदावरून दूर करताच परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सिंग यांनी केला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देशमुख यांच्यावर शरसंधान साधलं. याबद्दल विचारलं असता राणेंनी सावध उत्तर दिलं. 'अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी नाही. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकतं. अनेक मार्ग निघू शकतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती असून अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे, शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असेल. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्या का, यासंदर्भात माहिती नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर, खासदार संजय राऊत यांना हे सरकार टिकेल, असं वारंवार सांगावं लागतंय यातच सगळं आलं. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकार टिकेल, असे सांगावे लागते म्हणजे काहीतरी गडबड आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

 

Web Title: bjp mp narayan rane on ncp chief sharad pawar and amit shahs meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.