मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:31 PM2021-03-19T14:31:14+5:302021-03-19T14:42:49+5:30

BJP MP Narayan Rane : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासह राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

BJP MP Narayan Rane : person like Mukesh Ambani is unsafe in Mumbai, I've written to HM Amit Shah for CM's resignation & President's Rule in state | मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरून राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली असताना आता भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासह राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. (BJP MP Narayan Rane : person like Mukesh Ambani is unsafe in Mumbai, I've written to HM Amit Shah for CM's resignation & President's Rule in state)

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. "महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे", असे नारायण राणे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या घडामोडींनंतर विरोधीपक्ष भाजपाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून या बदल्या पुरेशा नसल्याचे म्हणत यामागे असणाऱ्या राजकीय शक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

("हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत")

'राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे'
दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्ले चढवले. केवळ पोलीस आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यापाठोपाठ आता नारायण राणे यांनीही  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Web Title: BJP MP Narayan Rane : person like Mukesh Ambani is unsafe in Mumbai, I've written to HM Amit Shah for CM's resignation & President's Rule in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.