“पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, ही काँग्रेसला दिलेली धमकी” 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:00 PM2021-06-11T19:00:12+5:302021-06-11T19:01:18+5:30

शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

bjp narayan claims that sharad pawar never contest elections with shiv sena | “पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, ही काँग्रेसला दिलेली धमकी” 

“पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, ही काँग्रेसला दिलेली धमकी” 

googlenewsNext

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे, असे कौतुकोद्गार काढत शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केलेल्या मार्गदर्शनावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवारांच्या काही मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. अशातच आता, पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, असे भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. (bjp narayan claims that sharad pawar never contest elections with shiv sena) 

हे महाविकास आघाडी सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे. 

ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. 

मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय? हायकोर्टाचा थेट सवाल

दरम्यान, शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भाजपा आमदार राम कदम यांनी देखील टीका केली होती. “शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे, अशी विचारणा राम कदम यांनी केली. 
 

Web Title: bjp narayan claims that sharad pawar never contest elections with shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.