Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:18 AM2021-07-27T11:18:02+5:302021-07-27T11:19:35+5:30

Chiplun Flood: भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून, जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

bjp narayan rane criticized shiv sena on chiplun flood and incident of bhaskar jadhav | Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

googlenewsNext
ठळक मुद्देलागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाटजनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीयभाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून, जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. (bjp narayan rane criticized shiv sena on chiplun flood and incident of bhaskar jadhav)

राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. तसेच भास्कर जाधव यांच्या गैरवर्तनावरून भाजपतील अनेक नेत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता सामनामधील अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट

जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्‍यामुळेच सामना मध्‍ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्‍द होते. लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्‍याचे कौतुकही करुन घेत नाही.  अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असे टीकास्त्र राणे यांनी सोडले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. महाड, चिपळूणला सगळय़ात जास्त फटका बसला. तळिये गावातील दुर्घटना भयंकर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळय़ा खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होडय़ा वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले, असे म्हणत शिवसेनेने विरोधकांवर टीका केली.
 

Web Title: bjp narayan rane criticized shiv sena on chiplun flood and incident of bhaskar jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.