Bihar Assembly Election Result : "शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 11:46 AM2020-11-11T11:46:00+5:302020-11-11T12:08:55+5:30
BJP Nilesh Rane And Shivsena Sanjay Raut : भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. भाजपाने नेते निलेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट केला आहे. यासोबतच "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन" असं म्हटलं आहे. तसेच बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रातसंजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे" असं ट्विट केलं आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
"राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल. भाजपासमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधींच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदींची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही" असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांनी याआधीही अनेकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
राहुल गांधीला राजकारणात बरच शिकावं लागेल. BJP समोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, MP, UP, कर्नाटका निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधीच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदी साहेबांची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ भ्रष्ट काँग्रेसशी युती करून बसलेत, भाजपाचा शिवसेनेवर निशाणा
बिहारच्या निकालात तेजस्वी यादव यांचं कौतुक करणाऱ्या शिवसेनेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरले आता महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Bihar Assembly Election Result : "11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही मोठं यश, जनतेने भाजपाला दिलेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक"https://t.co/oaROVPfEYH#BiharElectionResults2020#BiharElectionResults#Devendrafadnavis#NarendraModi#BJPpic.twitter.com/4WRBCi6Rc5
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2020
Bihar Assembly Election Result : "मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आला पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला"https://t.co/iWUw4Rt6bT#BiharElectionResults2020#BiharElectionResults#AmitShah#BJPpic.twitter.com/F9x9gknsXD
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2020