"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 01:11 PM2021-03-14T13:11:13+5:302021-03-14T13:13:59+5:30
BJP Prasad Lad And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर भाजपा आता आक्रमक झाली आहे. सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजपाच्या एका नेत्याने केली आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. या सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे असं देखील म्हटलं आहे.
आत्ता संशयित म्हणून एका सचिन वाझेला अटक झाली आहे.परंतु राज्यातील आत्महत्यांच्या इतर प्रकरणांचे काय? @NIA_India ने महाराष्ट्रात झालेल्या इतर आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे. @BJP4Maharashtra@abpmajhatv@zee24taasnews@MiLOKMAT@mataonline@TheMahaMTB@LoksattaLivepic.twitter.com/bhunYkVAHZ
— Prasad Lad (@PrasadLadInd) March 14, 2021
"सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे. सचिन वाझेंच्या माध्यमातून अजून किती लोकांच्या हत्या केल्या गेल्या याची देखील खात्री एनआयएने केली पाहिजे अशी मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे.
"होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी"; राम कदम यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/gAY264ckSp#RamKadam#BJP#Shivsena#UddhavThackeray#SachinVaze#SachinVazeArrested#MansukhHirenpic.twitter.com/1LIV0qhx0l
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021
"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"
सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"हे सगळं राजकारण सुरू आहे, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई", संजय राऊतांनी साधला निशाणाhttps://t.co/15LTfun4OW#sanjayRaut#ShivSena#SachinVaze#SachinVazeArrested#MumbaiPolicepic.twitter.com/Lnm47QDkoY
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021
"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"
सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर संजय राऊत यांचं ट्विट, म्हणाले...https://t.co/GAjixtCUJs#SanjayRaut#Shivsena#SachinVaze#SachinVazeArrestedpic.twitter.com/QjIesPIRgU
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021