OBC Reservation: संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 01:47 PM2021-06-27T13:47:19+5:302021-06-27T13:49:00+5:30
OBC Reservation: संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp pravin darekar criticises cm uddhav thackeray over obc reservation statement)
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले. यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
“त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका
संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?
ओबीसी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे आदळआपट असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे! संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून केली आहे. संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असे शिवसेना सांगत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
OBC व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे “आदळआपट” असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 26, 2021
‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही ? @OfficeofUT@CMOMaharashtra
दरम्यान, न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला होता. ते सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.