Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:32 PM2021-07-08T16:32:37+5:302021-07-08T16:34:51+5:30

Cabinet Expansion: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

bjp pravin darekar replied sanjay raut over narayan rane criticism | Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं”

Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं”

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तरसंजय राऊत भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाहीप्रवीण दरेकर यांनी लगावला टोला

मुंबई: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक चर्चा झाली ती नारायण राणे आणि त्यांना देण्यात आलेल्या खात्याची. नारायण राणे यांना देण्यात आलेल्या खात्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहिती होती. म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले, असा पलटवार भाजपने केला आहे. (bjp pravin darekar replied sanjay raut over narayan rane criticism)

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावर, राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. याला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला आहे. 

‘ही’ ३ कामे करू नका! नवीन मंत्र्यांसाठी PM मोदींनी आखून दिल्या लक्ष्मण रेषा

शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती

संजय राऊत यांना नारायण राणेंना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणे यांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे. नारायण राणे यांना मिळालेले खाते छोटे आहे की मोठे हे येणाऱ्या काळात ते त्यांच्या कामातून दाखवून देतील, या शब्दांत दरेकर यांनी पलटवार केला. 

“मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माझे बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले, चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केले आणि चांगले काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो मोठेपणा दाखवला नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 
 

Web Title: bjp pravin darekar replied sanjay raut over narayan rane criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.