नाशकात भाजपाला धक्का; माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल आज शिवबंधन बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 09:35 AM2021-01-08T09:35:42+5:302021-01-08T09:40:57+5:30

Vasant Geete, Sunil Bagul : वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते.

BJP pushed in Nashik; Former MLA Vasant Geete, Sunil Bagul will tie the knot today | नाशकात भाजपाला धक्का; माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल आज शिवबंधन बांधणार

नाशकात भाजपाला धक्का; माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल आज शिवबंधन बांधणार

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या दोघांनी काल रात्री उशिरा भेट घेतल्याचे वृत्त आहे. आज सकाळी अकरा वाजता खासदार राऊत यांची पत्रकार परिषद आहे.

नाशिक : माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल हे दोघे आज शिवबंधन बांधणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या दोघांनी काल रात्री उशिरा भेट घेतल्याचे वृत्त आहे. आज सकाळी अकरा वाजता खासदार राऊत यांची पत्रकार परिषद आहे. यावेळी दोघे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन बांधणार आहेत. काल त्यांच्या भेटीच्या वेळी माजी महापौर विनायक पांडे देखील उपस्थितीत होते.

वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते या पक्षात दाखल झाले होते. नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाने त्यांचे पुत्र प्रथमेश गीते यांना उपमहापौर पद दिले होते.

सुनील बागुल हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. त्यांनी आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या आई भिकुबाई बागुल या भाजपाच्या विद्यमान उपमहापौर आहेत.

Read in English

Web Title: BJP pushed in Nashik; Former MLA Vasant Geete, Sunil Bagul will tie the knot today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.