“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:29 PM2021-08-25T22:29:56+5:302021-08-25T22:33:51+5:30
भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे.
शिर्डी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन, निषेध, निदर्शने केली. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही मोठ्या प्रमाणात झडल्या. यातच भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp radhakrishna vikhe patil criticized thackeray govt over narayan rane arrest)
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला.
मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार
तर मग आरत्या ओवाळायच्या का?
पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही. लोकशाहीत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, अशी टीका करत इथे लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच करत नाही. असे असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक सवाल विखे पाटील यांनी केला आहे.
नीलम गोऱ्हेंनी राजीनामा द्यावा
जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार तोंडावर पडलेय, असा टोला लगावत नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. हे पद घटनात्मक पद आहे. ते कोणत्या पक्षाचे नसते. असे असतानाही त्या राजकीय भूमिका मांडतात, बोलतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी
दरम्यान, नारायण राणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागले. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर माफी मागावी. देशाचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव हे त्यांना समजत नसेल, तर हा देशवासीयांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.