Dahi Handi: “दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:46 PM2021-08-23T19:46:14+5:302021-08-23T19:56:46+5:30

भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला असून, दहीहंडी होणारच, असा पवित्रा घेतला आहे.

bjp ram kadam criticized thackeray over cancelled of dahi handi | Dahi Handi: “दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

Dahi Handi: “दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

Next
ठळक मुद्देप्रत्येकवेळी संयमाची, सबुरीची भाषा हिंदूंनाच का सांगायचीदहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोतभाजप नेते आणि आमदार राम कदम यांचा निर्धार

मुंबई:मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला असून, दहीहंडी होणारच, असा पवित्रा घेतला आहे. (bjp ram kadam criticized thackeray over cancelled of dahi handi)

“वेगवेगळी विधाने करणारे अजित पवार काय म्हणतात याला काडीची किंमत नाही”

कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो असे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

उत्सव सरसकट रद्द करु नका

काहीतरी नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करु नका. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचे नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची? दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांपैकी अनेकजण हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचीही फसवणूक सरकारने केली आहे. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. बियर बार, दारुचे ठेले सुरू करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचे स्वागत करू, नियमांचे पालन करू. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच, असा निर्धार राम कदम यांनी केला आहे.

दरम्यान, एकीकडे ही बैठक होत असतानाच दुसरीकडे एका महिन्यापूर्वीच मनसेने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केले. गेल्या वर्षी कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 
 

Web Title: bjp ram kadam criticized thackeray over cancelled of dahi handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.