Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:59 PM2021-04-05T19:59:03+5:302021-04-05T20:08:03+5:30

BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned : अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned And Param Bir Singh | Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल

Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल

Next

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. या प्रकरणी सिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. त्यावर आज सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरेंकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने मुख्यमंत्री अजूनही गप्प का? असा सवाल भाजपाकडून केला जात आहे. "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "सचिन वाझे यांचे प्रकरण बाहेर आले, तेव्हाच ते दिसते तितके साधे नाही, असे भाजपा नेत्यांनी सांगितले होते. अनिल देशमुखांच्या राजीनामान्यनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. 'इकडे आड तिकडे विहीर' अवस्था झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी काही बोलणार काय...?" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


"गृहमंत्र्यांचे कैवारी आता कुठे गेले? आता तर देशमुखांनी राजीनामा सुद्धा दिला. ‘तो लादेन आहे का’ असं म्हणून वाझेची पाठराखण करणारे मुख्यमंत्री अजूनही गप्प का?" असा सवाल देखील भाजपाने विचारला आहे. "कोर्टानं CBIचौकशी लावल्याने महाविकास आघाडीचा नाईलाज झाला आणि अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण तोवर सगळं आल-बेल असल्याचंच भासवण्यात आलं. सरकारचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी मौन सोडून या विषयावर काही बोलणार का? आता बऱ्याच जणांची पोलखोल होणार. "कशीही फसवणूक सेना कायद्याचीही बूज राखेना…", मुख्यमंत्री कधी मौन सोडणार?" असं भाजपाने म्हटलं आहे.

"वेदनादायी... आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा"

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपावर (BJP) टीकास्त्र सोडलं आहे. "वेदनादायी, आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिलं गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला" असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. वेदनादायी" असं मिटकरींनी म्हटलं आहे. 

"तोंड लपवायला जागा न उरल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 'मास्क' लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे"

भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडलं असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 

Web Title: BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned And Param Bir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.