मनसेत 'इनकमिंग'चा धडाका सुरूच, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर 'पक्षप्रवेश'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 04:06 PM2021-02-11T16:06:38+5:302021-02-11T16:07:43+5:30

Teacher Volunteers join MNS : नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

BJP Teacher Volunteers join MNS Ashok Murtadak leadership at Raj Thackeray residence Krishnakunj | मनसेत 'इनकमिंग'चा धडाका सुरूच, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर 'पक्षप्रवेश'

मनसेत 'इनकमिंग'चा धडाका सुरूच, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर 'पक्षप्रवेश'

googlenewsNext
ठळक मुद्देकालच ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनते इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. गुरुवारी नाशकातील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधीलमनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. (Teacher Volunteers join MNS at Raj Thackeray residence Krishnakunj)

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. कालच ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.

नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने मनसेत प्रवेश केला. आधी हे शिक्षक भाजपासाठी कार्यरत होते. तसेच, येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही आज मनसेत दाखल झाले. दरम्यान, आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त मनसेचे नगरसेवक निवडून आणू आणि राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये झंझावात सुरु होईल,अशी प्रतिक्रिया अशोक मुर्तडक यांनी यावेळी दिली.

भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश
बुधवारी ठाणे आणि वसई विरारमधील शेकडो भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

"मनसेसोबत युती होऊ शकते, पण…"
कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
 

Web Title: BJP Teacher Volunteers join MNS Ashok Murtadak leadership at Raj Thackeray residence Krishnakunj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.