लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरे खुली करा; भाजपची आग्रही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:18 PM2021-08-03T13:18:26+5:302021-08-03T13:19:05+5:30
सगळे खुले केले मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका करण्यात आली आहे.
नाशिक: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे अद्यापही बंद ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका करत, लसीकरण झालेल्या भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेऊ द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. (bjp tushar bhosale demands that open the temple for the vaccinated devotees)
“आमचा सीएम जगात भारी, सर्व लोकांच्या पाठीवर आपण ‘शिव पंख’ लावून द्या”
आताच्या घडीला चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली असून, सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. यात प्रार्थनास्थळांसाठी शिथिलता देण्यास ठाकरे सरकार तयार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?
ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो
सगळे खुले केले मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुल झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?
सर्व लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या
दरम्यान, सीएम साहेब, आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे; या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे, आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी, असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.