मुहूर्त ठरला! भाजपाला धक्का बसणार; आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 02:09 AM2020-10-14T02:09:09+5:302020-10-14T06:50:58+5:30

BJP leader Eknath Khadse may join NCP News: मुक्ताईनगरमधील बैठकीत निर्णय, धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP will be shocked; Eknath Khadse will join NCP along with former MLA | मुहूर्त ठरला! भाजपाला धक्का बसणार; आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

मुहूर्त ठरला! भाजपाला धक्का बसणार; आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

googlenewsNext

धुळे : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.

सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मीसुद्धा उपस्थित होतो. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच पत्रकाराना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांच्या कार्यक्रमाला खडसे गैरहजर
जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उभारलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमास एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांच्या स्रुषा खा. रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. खडसे यांच्या गैरहजेरीची चर्चा सुरू आहे.

फडणवीस म्हणतात... खडसे पक्षांतर करणार नाहीत
एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जामनेर येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, या कार्यक्रमाला खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे गैरहजर राहिले तर खासदार सुनबाई व समर्थकांनी मात्र उपस्थिती दिली. खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Read in English

Web Title: BJP will be shocked; Eknath Khadse will join NCP along with former MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.