“ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:17 PM2021-07-16T20:17:14+5:302021-07-16T20:21:30+5:30

माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

BJP will form government in Maharashtra says MP Ranjitsingh Naik Nimbalkar | “ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

“ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देमतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे.माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही

सातारा – भारतीय जनता पार्टीमुळे मी पहिल्यांदा खासदार झालो, अल्पावधीतच माझ्या नावाची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही, कार्यकर्त्यांनीही नाराज होऊ नका अशा शब्दात भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.

फलटण तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निंबाळकर म्हणाले की, माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती. पण मला मंत्रिपद मिळालं नाही. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे. मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. सिंचनाचे अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत असं खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.

इतकचं नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजपाचं सरकार येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा नाही तर लवकरच सत्यात उतरेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात विराजमान होईल असा दावा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तोपर्यंत विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ असा पुनरुच्चार गुरुवारीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली होती.

Web Title: BJP will form government in Maharashtra says MP Ranjitsingh Naik Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.