सरकारच्या गलथानपणामुळेच मृतांचा आकडा एक लाखावर - भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:44 AM2021-06-08T05:44:08+5:302021-06-08T05:44:39+5:30

Keshav Upadhye :

BJP's allegation that the death toll is over one lakh due to the government's greed | सरकारच्या गलथानपणामुळेच मृतांचा आकडा एक लाखावर - भाजपचा आरोप

सरकारच्या गलथानपणामुळेच मृतांचा आकडा एक लाखावर - भाजपचा आरोप

googlenewsNext

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळेच कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याची फळे राज्यातील जनता भोगत आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. राज्य शासनाच्या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर आहे. या अपयशावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले, असे उपाध्ये म्हणाले.

गोंधळाचा फटका सामान्यांना
मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम आहेत याची स्पष्टता नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: BJP's allegation that the death toll is over one lakh due to the government's greed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.