काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:41 PM2021-05-22T17:41:06+5:302021-05-22T17:41:52+5:30

Nana Patole criticize Bjp, Central Govenrnment on Corona Crisis: रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते.

BJP's bad politics in corona virus epidemic; Allegation of Nana Patole in Alibaug | काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : काेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप (BJP) केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्व सुचना दिली हाेती. मात्र, माेदी सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले (Nana patole) यांनी अलिबाग येथे केला. (Congress state president Nana Patole on alibag tour after Tauktae Cyclone hits kokan region.)


रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते.
यावेळी अलिबाग तालुक्यातील नवगाव, वरसोली , खानाव , वावे या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तौक्ते चक्रीवादळाने अपरिमित नुकसान केले आहे. शेतकरी , बागायतदार , मच्छीमार आणि घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागात पंचनामे झालेले नसल्याचे समोर येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पंचनामे करावेत. त्या नुकसानीचा आढावा योग्य प्रस्तावासह सरकारला सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांना केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजपा कोरोनाला केवळ राजकीय मुद्दा बनवत पाहत आहे. उपाय योजना करून देशातील जनतेला धीर देणे गरजेचे आहे.


अहंकारामुळे देशाला स्मशानभूमी बनविण्यावर भाजप सरकारने भर दिला आहे असा घणाघातही त्यांनी केला. कोणता पक्ष विदूषक आणि कोणता पक्ष नायक याबाबतचा कौल पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे. त्यामुळे अन्य राज्यातील निवडणूकांमध्ये काँगेस पक्षच देशाचा हिरो असल्याचे प्रमाणपत्र जणताच देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी खासदार हुसेन दलवाई , प्रदेश चिटणीस राजन भोसले , सुदर्शन पांडे , आबा दळवी ,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप , महिला जिल्हाध्यक्ष ऍड. श्रद्धा ठाकूर , ऍड. जे. टी. पाटील, ऍड. प्रवीण ठाकूर, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. प्रथमेश ठाकूर , ऍड. कौस्तुभ पुनकर , आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: BJP's bad politics in corona virus epidemic; Allegation of Nana Patole in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.