‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:37 AM2019-04-14T03:37:42+5:302019-04-14T03:39:41+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला ‘अली’चेच काय, नाहीच, ‘बजरंग बली’चेही मत मिळणार नाही.

BJP's claim of 'Ali' votes, 'Bajrang Bali' is not entitled; Mayawati clans! | ‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!

‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!

Next

बदायूं : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला ‘अली’चेच काय, नाहीच, ‘बजरंग बली’चेही मत मिळणार नाही. या निवडणुकीत ‘नमो नमो’ असा जप करणारे जाणार आणि ‘जय भीम’चा जयघोष करणारे सत्तेत येणार. आमची या देशाला सध्या खूप गरज आहे, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शनिवारी येथील जाहीर सभेत सांगितले.
महाआघाडीचे उमेदवार, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्या प्रचारार्थ बदायूं येथे सभा झाली. त्या म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मधून योगी यांच्या पक्षाला ‘अली’ चे मत मिळणार नाही, आणि माझ्या जातीशी संबंधित असलेल्या बजरंग बलीचेही मतदान होणार नाही.
निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर ठेवणार असल्याचे सांगत मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्तव्याबद्दल निशाणा साधला. ‘त्यांचे अली असतील, तर आमचे बजरंग बली आहेत’ असे योगी म्हणाले होते. मायावती म्हणाल्या, ‘त्यांना मी उत्तर देऊ इच्छिते. आमचे ‘अली’सुद्धा आहेत व ‘बजरंग बली’सुद्धा आहेत. आमच्यासाठी दोघेही आमचे आपले आहेत. आम्हाला कोणीही परके नाही, आम्हाला ‘अली’ही हवेत आणि ‘बजरंग बली’ही हवेत.


खास करून आम्हाला ‘बजरंग बली’ यासाठी हवेत की, ते माझ्या स्वत:च्या दलित जातीचे आहेत. ‘बजरंग बली’ यांच्या जातीचा शोध मी नव्हे, स्वत: योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. ‘बजरंग बली’ वनवासी आणि दलित जातीचे असल्याचे योगी यांनी स्वत:च जनतेला सांगितले आहे. आमच्याकडे ‘अली’सुद्धा आहेत आणि ‘बजरंग बली’सुद्धा आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. या दोघांच्या जोडीमुळे आम्हाला या निवडणुकीत खूप चांगला लाभ होणार आहे.

>कशावरून उद्भवला वाद
मायावती यांनी काही दिवसांपूर्वी सहारनपूर येथील देवबंद मध्ये मुस्लिमांनी एकजूट दाखवित महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. नंतर योगी यांनी मेरठ मध्ये एका सभेत ‘सपा-बसपा’आघाडीवर तीर साधला. त्यांची ‘अली’वर श्रध्दा असेल तर आमचा ‘बजरंगबली’वर विश्वास आहे, असे उदगार काढले होते.

Web Title: BJP's claim of 'Ali' votes, 'Bajrang Bali' is not entitled; Mayawati clans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.